मराठा समाजासाठी आजचा दिवस सुवर्णदिन असेल - गणेश बजगुडे पाटील

आवाज महाराष्ट्राचा न्यूज विशेष
बीड / २७ जानेवारी २०२४ हा दिवस मराठा समाजासाठी सुवर्णदिन असुन मराठा आरक्षणाच्या आजच्या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, युवकांचे भविष्य घडेल. स्व. आ. आण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील इथपर्यंत अनेक नेते मंडळी समाजाच्या हितासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढत होते मी स्वतः या लढ्यात गेली वीस वर्षे सक्रिय काम करत आहे. माझ्या नेतृत्वात ही अनेक आंदोलने झालेली आहेत, काठ्या लाठ्या जेल देखील आम्ही भोगलेले आहे. गेली सात दिवस अंथरवली सराटी ते नवी मुंबई या ऐतहासिक यात्रेचा मी स्वतः साक्षीदार असुन ना भुतो ना भविष्य अश्या मराठ्यांच्या एकजुटीमुळे निर्धवलेल्या सरकारला देखील मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडले. हा विजय मराठा आरक्षण चळवळीत सहभागी सर्व समाजबांधवांचा व मनोज जारांगे पाटील यांच्या प्रामाणिक पणाचा असुन समाजातील तरुणांचा यामुळे निश्चितच फायदा होईल आजचा दिवस हा आमच्यासाठी सुवर्ण दिन आहे परंतु आमचा हक्क आम्ही मागत असताना आमच्या मायमावल्याना अंथरलीत रक्त सांडावे लागले, अनेक निरपराध तरुणांना जेल भोगावे लागले, अनेक बांधवांनी आपला जीव ही गमावलेला आहे. आण्णासाहेब पाटील यांनी देखील २२ मार्च १९८२ ला विधानभवनावर मोर्चा काढून आरक्षणासाठी पाहिले बलिदान दिलेले आहे म्हणून आज नवी मुंबई येथे मी त्यांना अभिवादन करून सर्व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. असे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी आपल्याशी बोलताना सांगितले..

