कृषी विस्तार अधिकारी परभणी येथे अश्विनी लोंढे यांची निवड

Maharashtra
अत्यंत गरिबीच्या परिस्थितीवर मात करून मिळवले यश
केज /प्रतिनिधी
केज येथील अश्विनी बालासाहेब लोंढे यांनी गरिबीच्या परिस्थितीवर मात करून कृषी विस्तार अधिकारी या पदासाठी निवड झाल्याबद्दल केज तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे. आई वडिलांची गरिबी व त्यांनी केलेली मेहनत याची जाण ठेवून अश्विनीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे यश संपादन केल्यामुळे अश्विनीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या यशाबद्दल अश्विनीच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे .अश्विनी लोंढे यांना यापुढील असेच यश संपादन करत राहो अशा शुभेच्छा सुनील मोरे यांच्या परिवाराकडून दिल्या आहेत.

