धनंजय मुंडे व अजित पवार यांच्या नेतृत्त्वात काम करत केज शहराचा विकास करणार येडेश्वरी चषक अंतिम सोहळा सामन्यात बजरंग सोनवणे यांचे स्पष्टीकरण

Maharashtra

धनंजय मुंडे व अजित पवार यांच्या नेतृत्त्वात काम करत केज शहराचा विकास करणार येडेश्वरी चषक अंतिम सोहळा सामन्यात बजरंग सोनवणे यांचे स्पष्टीकरण

-------------------------------------------------------------------------------------

 

केज (प्रतिनिधी) केज येथील पंचायत समिती मैदानात येडेश्वरी फाउंडेशन आयोजित येडेश्वरी चॅम्पियन क्रिकेट सामन्यात आजोजन करण्यात आले होते. त्याचा अंतिम सामना आज शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. विजेता संघाला रु. ७१६१६ व ट्रॉफी चषक, उपविजेता संघाला रु.३५०१६ व ट्रॉफी चषक येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी बजरंग सोनवणे यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. 

मनोगत व्यक्त करताना सोनवणे म्हणाले कि,एक राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून धनंजय मुंडे व अजित पवार यांच्या नेतृत्त्वात काम करत केज शहराचा विकास करणार तसेच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या मैदान इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे ते म्हणाले.