पुरस्कार निस्वार्थ सेवेचा आदर्श शिक्षक श्री.जाहेर रहेमान शेख शिक्षकगौरव पुरस्काराने सन्मानित

Maharashtra

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

बीड /प्रतिनिधी

 सर्वसामान्यांची मुले घडवण्याचे, त्यांना अधिकाधिक उत्तमरीत्या शिक्षण देण्याचे कार्य,विध्यार्थी प्रति असलेली निष्ठा व सर्वांगीण विकासासाठी करत असलेली धडपड याची दखल घेऊन श्री.जाहेर रहेमान शेख यांना *वरदसाई फौंडेशन बालिंगा कोल्हापूर* मार्फत शिक्षकगौरव पुरस्कार -2024 देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानित करताना वरदसाई फौंडेशन चे श्री.रमेश कोळी (अध्यक्ष), श्री.विजय कुलकर्णी (उपाध्यक्ष)श्री.राजेश पाटील (सचिव),सौ.सुधा वाडकर(सरपंच) ,श्री.अतुल बोन्द्रे (सामाजिक कार्यकर्ते),श्री.सहदेव कांबळे सर,श्री.आकाराम कांबळे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच पुरस्कार मिळालेबद्दल गावच्या सरपंच डॉ.अनिताताई दहिफळकर,शाम विद्यालयाच्या प्राचार्या जयश्री इप्पर/गदळे, डॉ.शालिनीताई कराड, प्राचार्य श्री.राहुल गदळे,प.स.सदस्य श्री.पिंटू(बप्पा)ठोंबरे,विद्युत अभियंता श्री.शरद बप्पा गदळे,श्री.हनिफ शेख,श्री.अनिल ठोंबरे सर,प्रा.जावेद शेख,श्री.विक्रम ठोंबरे सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.