संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या "सुवर्णरत्न" पुरस्कारांचे शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी वितरण*

Zilla Vishesh

आवाज महाराष्ट्राचा न्यूज डिजिटल मिडिया 

 

शिवकुमार निर्मळे, सुधाकर देशमुख, वर्षाताई मुंडे, विद्याधर पंडित यावर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी

-----------------------------

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या "सुवर्णरत्न" पुरस्कारांचे वितरण यावर्षी शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी हे पुरस्कार शिवकुमार निर्मळे (पत्रकारिता), वृक्षमित्र सुधाकर देशमुख (सामाजिक), वर्षाताई मुंडे (शैक्षणिक) आणि विद्याधर पंडित (कला) यांना जाहिर झाले आहेत. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्यवाहक प्रा.कैलास भागवत चोले यांनी केले आहे. 

 

येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षीच "सुवर्णरत्न" पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी मंगळवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात पुरस्कारांचे वितरण व संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला आहे. या पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव लहाने (सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन) हे तर उद्घाटक म्हणून डॉ.नरेंद्र काळे (सचिव, बनेश्वर शिक्षण संस्था) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे (माजी नगरसेवक न.प.अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून शेख चाॅंद (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई), ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे( ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई) विशाल जाजू (चेअरमन, आर.डी.देशपांडे नागरी सहकारी पतसंस्था), दगडू लोमटे (प्रमुख सुवर्णरत्न पुरस्कार वितरण समिती) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवकुमार निर्मळे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, शिक्षणतज्ज्ञ वर्षाताई मुंडे, प्रख्यात चित्रकार विद्याधर पंडित या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'सुवर्णरत्न पुरस्कार-२०२५' देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास आपण जरूर उपस्थित रहावे असे अवाहन संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या सचिव प्रा.कैलास भागवत चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे, सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती घाडगे प्रिया, श्रीमती अनिता कुलकर्णी व संकल्प परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.