राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत अंबाजोगाईच्या पार्थ अकॅडमीने सलग पाचव्यांदा मिळविले प्रथम विजेतेपद

Maharashtra

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

 

*पार्थ अकॅडमीची राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील कामगिरी ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब आहे - अक्षय मुंदडा*

 

*पार्थ अकॅडमीने सुंदर हस्ताक्षराचा संस्कार रूजविला - डॉ.राजेश इंगोले*

 

*_राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांकडून गुणगौरव_*

=======================

 अंबाजोगाई (प्रतिनिधी)

'राष्ट्रीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा' या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम येण्याचा बहुमान अंबाजोगाईच्या पार्थ अकॅडमीने पटकावला आहे. अकॅडमीचे सिध्दांत संदीप कापसे व अनन्या संदीप चव्हाण हे विद्यार्थी राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आले आहेत. तर ९ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी अकॅडमीचे ६ विद्यार्थी हे राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आले होते. कॅलिग्राफर विनोद आडे यांच्या पुढाकारातून असंख्य विद्यार्थ्यांच्या अक्षरात अमुलाग्र बदल व परिवर्तन झाले आहे. अकॅडमीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच अंबाजोगाई येथे करण्यात आले होते.

 

शहरातील स्व.विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले हे होते, प्रमुख अतिथी म्हणून अक्षय मुंदडा (युवा नेते भाजपा), सुप्रसिद्ध ह्रदय रोग तज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे, मुख्याध्यापिका गितांजली कुलकर्णी, रामराव आडे, कॅलिग्राफर विनोद आडे यांच्या हस्ते अकॅडमीच्या गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकून राहणे हे मोठे आव्हान आहे. असे सांगून मातृभाषेसोबतच इतरही भाषा आत्मसात करा. मनात ध्येय ठेवा. सुंदर हस्ताक्षर क्षेत्रात करीअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पार्थ अकॅडमीची कामगिरी ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत मुंदडा यांनी व्यक्त केले. तर यावेळी अक्षर सुंदर करण्याचे संस्कार पार्थ अकॅडमी निरंतर करते असे मुख्याध्यापिका गितांजली कुलकर्णी यांनी सांगितले. तर विनोद आडे हे मेहनतीने पुढे आलेले ध्येयवेडे व्यक्तिमत्व आहे. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश संपादन करावे असे डॉ.नवनाथ घुगे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.राजेश इंगोले म्हणाले की, आडे भावंड हे गुणवंत आहेत. पार्थ अकॅडमीच्या माध्यमातून विनोद आडे यांनी अंबाजोगाईत अक्षराचा संस्कार रूजविला. नाव उंचावून ते अंबाजोगाईच्या इतिहासाला ते एक नवा आयाम देत आहेत. सुंदर अक्षर हा अनमोल अलंकार आहे. आज मोबाईलमुळे मुलांमध्ये विविध मानसिक आजार वाढत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. मुलांना वेळ द्यावा. मुलांशी संवाद साधावा असे आवाहन डॉ.इंगोले यांनी केले.‌ प्रास्ताविक करताना पार्थ अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांनी सांगितले की, मागील ९ वर्षांपूर्वी या स्पर्धेत मुंबईचेच विद्यार्थी सर्वप्रथम यायचे मात्र मुंबई व पुणे यांची मक्तेदारी खंडीत करण्याचे काम अंबाजोगाईच्या पार्थ अकॅडमीने करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्पर्धेत दरवर्षी संपुर्ण देशातून तब्बल ७ ते ८ लाख विद्यार्थी सहभागी होतात. आपले विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरांवर उत्तुंग यश मिळवत आहेत. पार्थ अकॅडमीच्या माध्यमातून मागील दहा वर्षांत बीड, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर येथील ३१०० पेक्षा ही अधिक विद्यार्थी प्रशिक्षित केले आहेत. तर पुढील काळात ऑनलाईन माध्यमातून राज्यातील १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार असल्याचे विनोद आडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार डॉ.वैभव काळे यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय व राज्य हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते : १) सिद्धांत संदिप कापसे (वर्ग २ री, ग्रुप ए - १ ली ते ४ थी, संपुर्ण राज्यातून सर्वप्रथम), पुरस्काराचे स्वरूप : सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, 'ओशन रिव्हिलींग द सिक्रेट्स ऑफ द डिप', हा ग्रंथ तसेच पुष्पगुच्छ, २) अनन्या संदिप चव्हाण (ग्रुप बी - ५ वी ते ८ वी संपुर्ण राज्यातून सर्वप्रथम), पुरस्काराचे स्वरूप : (सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, 'द एनसायक्लोपिडीया ऑफ ऍनीमल्स अ कम्प्लीट विज्युअल गाईड' हा ग्रंथ तसेच पुष्पगुच्छ. राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते - ग्रुप - ए (१ ली ते ४ थी) - १) अर्णव भगीरथ कराड (प्रथम क्रमांक), २) तेजल अच्युत मुंडे - (द्वितीय क्रमांक) आणि ३) शरयु गोविंद मैड - (तृतीय क्रमांक) प्राप्त केला. ग्रुप - बी (५ वी ते ८ वी) - १) गौरी रमेश कांबळे - (प्रथम क्रमांक), २) फैजल अझरूद्दीन शेख - (द्वितीय क्रमांक) आणि ३) आरूषी दत्तप्रसाद बाहेती - (तृतीय क्रमांक), तसेच सुवर्णपदक विजेते : ग्रुप - सी (९ वी ते १२ वी) १) दिशा जितेंद्रकुमार हरदास - (प्रथम क्रमांक), २) प्रथम दत्तप्रसाद बाहेती - (द्वितीय क्रमांक) आणि ३) ज्ञानदा सुनिल वनवे - (तृतीय क्रमांक) प्राप्त केला. या सर्व विजेत्यांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आले. तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या सोबतच पार्थ अकॅडमीला बेस्ट परफॉर्मन्स स्कुल अवॉर्ड प्राप्त झाले. सतत ५ वर्षे राष्ट्रीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल पार्थ अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांचा ही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल खोकले, ओम पिंपळे,प्रकाश मुंडे, महेश अंबाड, गितांजली धायगुडे व अश्विनी विनोद आडे यांनी पुढाकार घेतला. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.