अंबाजोगाई क्रेडाईच्या अध्यक्षपदी संजय सुराणा तर सचिवपदी पवन भराडीया यांची सर्वानुमते निवड

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई क्रेडाईच्या अध्यक्षपदी संजय सुराणा यांची फेरनिवड तर सचिवपदी पवन गिरधारीलाल भराडीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडींचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
बिल्डर डेव्हलपर बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई ही संपूर्ण देशभर कार्यरत आहे. क्रेडाई अबाजोगाई शाखेच्या अध्यक्षपदी संजय सुराणा यांची फेरनिवड तर सचिवपदी पवन भराडीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी जी.डी.थोरात यांनी सदरील निवडी जाहीर केल्या. सदर नवनिर्वाचित कार्यकारिणी ही सन २०२५ ते २०२७ या वर्षांसाठी निवडण्यात आली आहे. सदरील निवड प्रक्रियेत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष ना.समीर काझी, बीड क्रेडाईचे माजी अध्यक्ष अतुल संघानी, मार्गदर्शक तथा माजी उपनगराध्यक्ष अनंतराव लोमटे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, माजी सचिव शकील बागवान, आबा कदम, कृष्णा सुनिलकाका लोमटे, कुलदीप परदेशी, कचरूलाल सारडा, बाळासाहेब थोरात, संतोष जाधव यांनी सहभाग घेतला. सदरील निवड प्रक्रियचे वैशिष्ट्ये म्हणजे सुस्पष्टता, विश्वासार्हता आणि एकमताने घेतलेला निर्णय हे होय. महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्लजी तावरे व सचिव आशिषजी पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईत क्रेडाईच्या नुतन कार्यकारणीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जी.डी.थोरात हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंददादा लोमटे व मनोज लखेरा हे मान्यवर उपस्थित होते. अंबाजोगाई क्रेडाईच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले संजय सुराणा हे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मुंबईचे सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत नगरविकास विभागाच्या संबंधित विषयाच्या कमिटीचे को-कनव्हेनर ही आहेत. संजय सुराणा आणि पवन भराडीया यांच्या निवडीबद्दल नवनिर्वाचित कार्यकारिणीचे केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, राजूसेठ भन्साळी, किशोर परदेशी, भुषण ठोंबरे संजय गंभीरे, शरद इंगळे, आसरार कुरेशी, प्रेमचंद मुथा, सुभाष बडेरा, आनंद जाजू, मुजम्मील कुरेशी, कल्याण काळे, धनराज सोळंकी यांनी अभिनंदन केले आहे. संजय सुराणा यांना बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यांच्यावर लोकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आहे आणि एक कुशल संघटक, जनहित जपणारे सर्वसमावेशक दृष्टिकोन जपणारे व्यक्तीमत्व म्हणून सुराणा यांनी सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवून क्रेडाई अबाजोगाई शाखेचे ते अध्यक्ष म्हणून सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतीक बनले आहेत. ते आपल्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अंबाजोगाई क्रेडाई अधिक सक्षम, सक्रिय व लोकाभिमुख होईल असा विश्वास त्यांची फेरनिवड करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. पवन गिरधारीलाल भराडीया हे बिल्डर डेव्हलपर बांधकाम व्यावसायातील तरूण नेतृत्व तयार होत आहे. भराडीया हे अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करतात. कोविड काळात त्यांनी गरजूंना भरीव मदत केली आहे. भराडीया परिवार जनतेसाठी सातत्याने पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देत आहे. धार्मिक, सामाजिक क्षेत्रात भराडीया परिवार जनसेवेसाठी सदैव कार्यरत आहे. आपल्या फेरनिवडीबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई क्रेडाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सुराणा म्हणाले की, क्रेडाई संघटनेमध्ये मागील काही वर्षांत आम्ही सर्वजण यांनी मिळून केलेल्या शिस्तबद्ध कामाची पोहोचपावती म्हणून सर्व सदस्यांकडून आपली एकमताने अध्यक्षपदी फेरनिवड करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्लजी तावरे सर व सचिव आशिषजी पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे. क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था असून तिच्या महाराष्ट्रात साठ शाखा आहेत व साडे तीन हजारांहून अधिक सदस्य आहेत. क्रेडाई सदस्य असणे हि एक मानाची बाब असून, सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर क्रेडाईचे विशेष कोड ऑफ कंडक्ट असून त्याप्रमाणे अधिकार व जबाबदारी ही असते, सर्व सदस्यांना याचे पालन करणे बंधनकारक असते. बांधकाम क्षेत्रामध्ये कोणते ही बदल घडवताना, नियम बनवताना शासनाच्या वतीने क्रेडाई संघटनेचे मत विचारात घेतले जाते, क्रेडाई संघटने बरोबर चर्चा ही केली जाते. क्रेडाई संघटनेला बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यामधील दुवा मानला जातो. ग्राहकांची कोणती ही अडचण किंवा तक्रार असल्यास ती न्याय्य पद्धतीने क्रेडाई मार्फत सोडविली जाते. शासकीय नियमानुसार 'रेरा'कडे प्रकल्प नोंदणीकृत करण्यासाठी क्रेडाई सदस्य असणे बंधनकारक आहे. अशी माहिती अंबाजोगाई क्रेडाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सुराणा यांनी दिली आहे. क्रेडाई अंबाजोगाईच्या नुतन कार्यकारणीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

