काळेगाव येथील काळेगाव उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव येथे बारावी सायन्सचा निकाल १०० टक्के , तर आर्ट्स चा निकाल 92.59 टक्के

केज/ प्रतिनिधी
राज्यातील बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक (HSC Result 2025) परीक्षेचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला .तरी काळेगाव येथील काळेगाव उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव येथील विद्यालयांमध्ये सायन्स चा निकाल 100 टक्के तर आर्ट्स चा निकाल 92.59 टक्के लागलेला आहे. सायन्स मधून प्रथम क्र.- सुतार सायली राजू 81.50 टक्के, द्वितीय क्र.-वटाणे ओमकार सुमंत 80.67 टक्के तृतीय क्र.- बिक्कड मुक्ताबाई महादेव 80.17 टक्के व सुरवसे ओम अशोक 80.17 टक्के तसेच आर्ट्स मधुन प्रथम क्र.- सानप सुनील कानिफनाथ 75.83 टक्के,द्वितीय क्र.- साळवे शिल्पा ज्ञानेश्वर 75.33 टक्के, तृतीय क्र.- काळे अजयकुमार नवनाथ 74.67 टक्के या विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याकरिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे संस्थचे सचिव जयदत्त गदळे व संस्थेचे अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राहुल गदळे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यालयातील उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

