दहावी परीक्षेत शंभर टक्के घेणारे २२ विद्यार्थी तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे ६०४ विद्यार्थी - भाशिप्र कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांची माहिती

Aarogya Shikshan

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या एकुण १० माध्यमिक शाळांनी दहावीच्या परीक्षेत यशस्वी वाटचाल करीत गुणात्मकदृष्ट्या नामांकन मिळविले. ज्ञान आराधना हेच आमचे आद्य कर्तव्य असुन परीक्षेला एकुण २५५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २२ मुला-मुलींनी १०० पैकी १०० गुण घेवून उज्ज्वल यश संपादन केले. तर ९० पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी एकुण ६०४ असल्याची माहिती संस्था कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी दिली.

 

भाशिप्र संस्थेच्या वतीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात संस्था कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी म्हटले आहे की, आमच्या संस्थेच्या एकुण १० माध्यमिक शाळा ज्यामध्ये श्री केशवराज (लातुर), खोलेश्वर (अंबाजोगाई), लोकमान्य टिळक (पोखरी), सिद्धेश्वर (माजलगाव), स्वा.सावरकर (बीड), कै.दत्ताजी भाले (आंबड), आर्य चाणक्य (पैठण), चिंतेश्वर (गेवराई), लाल बहादुर शास्त्री (उदगीर), प.पु.गोळवलकर गुरूजी (देगलुर) आदी ठिकाणी शाळा चालतात. नुकत्याच जाहिर झालेल्या दहावीच्या परीक्षेत एकूण शाळांचा निकाल ९७.८३ टक्के असून गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. व आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता त्याचबरोबर मुला-मुलींचा सर्वांग विकास हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत संस्था मार्गक्रमण करते आहे. विद्यासभा तथा विविध रचनात्मक समित्या यावर काम करतात. सर्व शाळेत मिळून २५५८ विद्यार्थी यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते. १०० पैकीच्या पैकी गुण घेणारे सर्वाधिक १३ लातुर केशवराज शाळेचे तर सिद्धेश्वर माजलगाव येथील ०५ मुलांनी पैकीच्या पैकी गुण घेतले. प.पु.गोळवलकर गुरूजी शाळेच्या तीन मुलांनी तर खोलेश्वर अंबाजोगाई शाळेत एका मुलाने पैकीच्या पैकी मार्कस मिळवले. सर्व शाळेचे निकाल साधारणत: ९८.०० पुढे असून आर्य चाणक्य पैठण शाळा, आणि चिंतेश्वर गेवराई शेकडा निकालात पैकीच्या पैकी गुण संपादन केले. ९० टक्क्याच्या पुढे एकट्या केशवराज शाळेचे २५२ विद्यार्थी हे आमच्यासाठी स्वाभिमानाची बाब निश्चित वाटते. सर्वच शाळेत ९० च्या पुढे, १०० च्या आसपास गुणवत्तेची आघाडी असुन ६०४ एकुण संख्या असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले. या संस्थेत काम करणारा शिक्षक हा कार्यकर्त्याच्या स्वरूपाने रात्रंदिवस कठोर परिश्रम घेतो. ज्यामुळे आम्हाला गुणवत्तेत आघाडी निश्चित मिळते. सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ठिकठिकाणी संस्कार केंद्रात परिश्रम घेतात. ज्यामुळे ज्ञानार्जन यज्ञात मिळालेले यश आम्हा संस्था, पदाधिकारी सहाकार्‍यांच्यासाठी निश्चितच स्वाभिमान वाटावे असे. दरम्यान सर्व शाळेला मिळालेल्या गुणवत्तापुर्वक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलूरकर, विद्यासभा अध्यक्ष डॉ.जयंत जोशी, उपाध्यक्ष उमेश जगताप, संयोजक महेश कस्तुरे, प्रशासकिय अधिकारी चंद्रकांत मुळे आणि सर्व सन्माननीय संचालकांनी विद्यार्थी तथा शिक्षक कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.