*संकल्प विद्या मंदिर शाळेचे नम्रता जोपासणारे विद्यार्थी - तहसीलदार विलास तरंगे

Zilla Vishesh

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणारी संकल्प विद्या मंदिर शाळा - गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार

 

आयडियल उपक्रम राबविणारे संकल्प विद्या मंदिर - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

शहरातील प्रशांतनगर भागातील अल्पावधीत नांवारूपाला आलेले संकल्प विद्या मंदिर येथे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त, विविध मेडल्स प्राप्त, गुणवत्ता यादीमध्ये झळकलेल्यांसह एकूण १८० विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी आयोजित केला होता.

 

येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात शनिवार, दिनांक २८ जुन रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार हे होते. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार विलास तरंगे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, अधिव्याख्याता डॉ.योगेश सुरवसे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंतदादा लोमटे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे, स्पर्धा परीक्षा समन्वयक संतोष राऊत यांची तर विचारमंचावर संस्थाध्यक्ष कैलास चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांची ही उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने स्कॉलरशिप टॅलेंट सर्च, ज्युनियर आयएएस, एमटीएस (जळगाव) यासह विविध परीक्षेसाठी विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बसतात. असे सांगून वर्षभर संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवून चि.सोहम चव्हाण, चि.श्रेयश पौळ, कु.श्रेया चाटे, कु.श्रावणी कांगणे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असून स्कॉलरशिप अवॉर्डसाठी प्राप्त चि.स्वरूप गणेश लाड तसेच विविध मेडल्स प्राप्त १८० हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. सुरूवातीला बोलताना ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याने सातत्यपूर्ण अभ्यास करून आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करावे, व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर डॉ.योगेश सुरवसे यांनी बोलत असताना बीड जिल्ह्यात संकल्प विद्या मंदिर शाळा ही शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच नांवारूपाला आलेली शाळा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना व पालकांना जुनी शिक्षण पद्धत व आताची शिक्षण पद्धत समजून सांगितले व पालकांसाठी अनमोल असे मार्गदर्शन केले. तर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी संकल्प विद्या मंदिर ही आयडियल उपक्रम राबविणारी शाळा असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षा संदर्भात सातत्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला.‌ नेहमीप्रमाणेच त्यांनी विविध उदाहरणे देत, महामानवांचे संदेश, संदर्भ व त्यांच्या कार्याचे दाखले देत विद्यार्थी आणि उपस्थित पालकांशी दिलखुलास संवाद साधला. व अतिशय मौलिक असे मार्गदर्शन केले.‌ डॉ.इंगोले यांच्या समायोचित मार्गदर्शनामुळे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. याप्रसंगी तहसीलदार विलास तरंगे यांनी ही संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून मनाला समाधान वाटले असे नमूद केले. या शाळेत शिकणारे विद्यार्थी व त्यांचे पालक नशिबवान आहेत. तर ज्यांचा प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू झाला आहे अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतो. त्यामुळे मला या चोले दांम्पत्याचा व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक वाटते. कारण ३५ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला प्रवास हा सोपा नसतो. हे यश शिक्षकांचे सातत्यपूर्ण योगदान व विद्यार्थ्यांचे परीश्रम यामुळे हे संपादन करता आले. विद्यार्थ्यांनो खूप खेळा, खूप शिका व अभ्यास करा. आनंदी रहा असे आवाहन तहसीलदार तरंगे यांनी केले. यावेळी माता, पिता पालक, विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई फड, प्रगती केंद्रे ,अक्षरा निकम, भक्ती गायकवाड या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षिका श्रीमती पी.एच.नायक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्रीमती कौशल्या शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संकल्प विद्या मंदिर शाळेचे शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तर सांगता पसायदानाने झाली.