श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा निमित्त १६ ते २२ जुलै दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
*आज ग्रंथ दिंडीने होणार प्रारंभ ; भाविक भक्तांनी लाभ घ्यावा - आवाहन*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा निमित्त अंबाजोगाईत आज बुधवार, दिनांक १६ ते २२ जुलै दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सांगता २३ जुलै रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होईल अशी माहिती संयोजक, समस्त माळी समाज, अंबाजोगाई यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वै.ह.भ.प.माधवशात्री महाराज यांच्या आशिर्वादाने व ह.भ.प.किसन महाराज पवार व ह.भ.प. गुरूवर्य प्रेममुर्ती अरूण महाराज बर्दापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संत सावतामाळी मंदिर, आद्यकवी मुकुंदराज रोड, अंबाजोगाई (जि.बीड.) या ठिकाणी आयोजित श्री संत सावता महाराज महात्म्य कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ आज बुधवार, दिनांक १६ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता जिरे गल्ली येथून ग्रंथ दिंडीने होईल, तर सकाळी आकरा वाजता कलश पूजन व टाळ-वीणा-मृदंग पूजन हस्ते ह.भ.प.किसन महाराज पवार, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, सुभाष राऊत, कल्याण आखाडे, आनंद शंकरराव शिंदे, ह.भ.प.अरूण महाराज शिनगारे, ह.भ.प.अमोल महाराज घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.महेश महाराज येरोळकर, मूंदगाचार्य ह.भ.प.गणेश आढाव, ह.भ.प.ऋषि महाराज मोरवडकर, ह.भ.प.दिपक महाराज कोरडे, गायनाचार्य ह.भ.प.महेश महाराज येरोळकर, भजनी मंडळ : श्री मुकुंदराज गुरूकुलचे सर्व विद्यार्थी (मुकुंदराज स्वामी मंदिर,अंबाजोगाई) हे असणार आहेत. दिनांक १६ ते २२ जुलै दरम्यान कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, सकाळी ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण महात्म्य, सकाळी १० ते ११ गाथा भजन, सकाळी ११ ते दुपारी १ भोजन, दुपारी १ ते २ विश्रांती, दुपारी २ ते ५ सावता माळी महात्म्य कथा वाचन (कथा), सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन, रात्री ९ ते १० भोजन आणि रात्री १० ते १२ हरिजागर) अशी आहे. या दरम्यान ह.भ.प.मनोज महाराज माने (पावनधाम), ह.भ.प.किसन महाराज पवार, ह.भ.प.गोविंद महाराज सुकरे, ह.भ.प.उद्धव महाराज रमजानपूरकर, ह.भ.प.पाडुळे ताई (लातूर), ह.भ.प.यशवंत महाराज कातळे (बाल किर्तनकार) आणि ह.भ.प.दत्ता महाराज तांदळवाडीकर हे आपली किर्तन सेवा देतील. तर कथा वाचक म्हणून सर्वश्री ह.भ.प.भारती महाराज, दामोदर गिरी महाराज, अर्जुन अशोक पवार महाराज, भांडे महाराज, पुरी महाराज, हाके महाराज, चाटे महाराज, वरवटकर महाराज, शिवाजी हरदास महाराज, मधुकर घोडके महाराज, रामभाऊ गायकवाड महाराज, व्यंकट पाथरकर महाराज, अशोक पवार महाराज, दत्तात्रय उडाणशिव महाराज, लोंढाळ महाराज, अशोक शिंदे महाराज, सचिन ठाकर महाराज हे आपली सेवा देतील. या सप्ताहाची सांगता बुधवार, दि.२३ जुलै रोजी ह.भ.प.गुरूवर्य प्रेममुर्ती अरूण महाराज बर्दापूरकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत होवून त्यानंतर महाप्रसाद होईल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष अंकुश घोडके, उपाध्यक्ष सुरेश बलुतकर, अनंत अरसुडे, सचिव अर्जुन वाघमारे, सहसचिव भागवत मसने, कोषाध्यक्ष संतोष राऊत, राम घोडके, सदस्य सर्वश्री बळीराम चोपणे, प्रकाश बलुतकर, लक्ष्मण पाथरकर, मधुकर जिरे, नामदेव माळी, दत्तात्रय घोडके, रमेश जिरे, बबन घोडके, दशरथ जिरे, बालासाहेब मसने, अशोक बलुतकर, बालासाहेब माळी, प्रदीप जिरे, विष्णु राऊत, सुभाष चोपणे, डॉ.सुरेश अरसुडे, डॉ.दिपक फुटाणे, बालासाहेब चोपणे, विठ्ठल शिंदे, रमेश घोडके, सिद्राम घोडके, मधुकर घोडके, अशोक जिरे, तुषार करपुडे, बालासाहेब घोडके, संतोष जिरे, गोविंद पाथरकर, पवन जिरे, योगेश डाके, महेश सपाटे, आशिष आढाव, अभिजीत जिरे, शरद माळी, तुकाराम माळी, मंगेश बलुतकर, नितीन जिरे, दिपक गिरे, बबनराव जाधव, पंकज राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. तरी अंबाजोगाई शहर व परिसरातील भाविक भक्तांनी श्री संत सावता महाराज महात्म्य कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक, समस्त माळी समाज अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

