राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी रंजीत घाडगे यांची निवड

Zilla Vishesh

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

 

बीड/प्रतिनिधी 

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडागळे , व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या आदेशानुसार रंजीत घाडगे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या "बीड जिल्हाध्यक्ष" या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पुरोगामी पत्रकार संघात करत असलेले काम व संघटन कौशल्य तसेच पत्रकारा विषयी आपली असलेली तळमळ पाहता, आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये मोठी जबाबदारी देत आहोत. या निवडी बद्दल बीड जिल्ह्यातील पुरोगामी पत्रकार संघाला मिळाले आहे. या निवडीबद्दल पुरोगामी पत्रकार संघातून तसेच इतर सर्व क्षेत्रातून रंजीत घाडगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.