प्रमोद महाजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्र प्रशाला केंद्रात रोजगारक्षम अल्पकालीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Samajik

आवाज महाराष्ट्राचा न्यूज 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील प्रमोद महाजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, अंबाजोगाई येथे अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने (डिजिटल माध्यम) करण्यात आले. त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई येथे सहा अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री महोदय मंगल प्रभातजी लोढा यांचे संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे.

 

या उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई येथील उद्घाटन विश्वकर्मा लाभार्थी महादेव क्षीरसागर यांच्या हस्ते क्लास रूमचे उद्घाटन करून करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे-सोनवणे, नायब तहसिलदार श्रीमती स्मिता बाहेती, बिडीओ एस.एल.कांदे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी उद्धव कोल्हेवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष आयएमसी सदस्य विमलकर देशपांडे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे प्राचार्य पि.टी.मुने यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती एस.ए.क्षीरसागर (गट निदेशिका), मुख्य लिपिक आर.सी.धस, बि.आर.म्हेत्रे, भंडारपाल अभय पोटपल्लेवार, निलेश म्हातारमारे, व्हि.पी.साबळे, सौ.भाग्यश्री पाटील, श्रीमती मांडगे रोहीणी, बि.एस.बरगे, एस.जी.गित्ते, जि.पी.चाटे, जि.ए.वेदे, सोमेश्वर पुजारी, सि.टी.भोसले, डि.एस.दहीफळे, एम.बी.शेख यांनी पुढाकार घेतला. यावेळी सर्व कर्मचारीवृंद व मान्यवर यांच्यासह प्रशिक्षणार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत ओव्हाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन रफिक शेख यांनी करून उपस्थितांचे आभार नितेश बडे यांनी मानले. या संस्थेत आज शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर पासून १) असिस्टंट ब्युटी थेरपी, २) सोलार टेक्निशियन, ३) फिल्ड टेक्निशियन (एअर कंडिशनर), ४) बॅटरी सिस्टीम रिपेअरिंग टेक्निशियन, ५) टू व्हीलर सर्व्हिसिंग टेक्निशियन आणि ६) शिवण मशीन ऑपरेटर हे सहा अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य पि.टी.मुने यांनी केले.