.जिल्हा परिषद शाळा धर्माळा शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
बातमी संकलन - लक्ष्मीकांत लासिणकर
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा.
केज तालुका प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे धर्माळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी ज्यांना सदैव शाळेविषयी तळमळ असते असे श्री .संजय जाधव यांची निवड उपसरपंच श्री वैजनाथ सोळुंके यांच्यासह सर्वानुमते करण्यात आली तर शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत कदम यांनी विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीराम देशमुख सर , अंगणवाडी ताई , मदतनीस ताई , शाळेतील ट्रेणी शिक्षिका प्रियांका कदम , तंत्र स्नेही शिक्षिका महादेवी फुलसुरे यांची विशेष उपस्थिती होती तर यावेळी शाळेच्या सर्व अडीअडचणी शाळेच्या माजी विद्यार्थी यांना यावेळी मार्गदर्शन पर मुख्याध्यापक यांनी सांगितले यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी भावी पिढी सुदृढ व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट घडावी यासाठी आम्ही सदैव तत्पर रहु आसे सांगितले तर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत याच प्रांगणात आम्ही शिक्षणाचे धडे घेतले आणि भविष्याची स्वप्ने पूर्ण केली आज पुन्हा मेळाव्यानिम्मित उपस्थित असताना विद्यार्थी दशेतील अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले ज्या शाळेने आम्हाला घडवले त्याच शाळेत आज पुन्हा आम्ही सर्व माजी विद्यार्थी एकत्र आलोत याचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना होतो आहे आसे गौरवोद्गार उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले व सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पणे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला .

