बारावी नंतर पुढे काय..? : उद्या शुक्रवारी विद्यार्थी व पालकांसाठी अंबाजोगाईत मोफत करियर गाईडन्स सेमिनार

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
*एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे व ऍडमिशन सजेशनचे आयोजन*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बारावी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्या शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद कार्यालय परिसर, अंबाजोगाई (जि.बीड) येथे विशेष करिअर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे व ऍडमिशन सजेशनच्या वतीने हा सेमिनार होणार असून संपूर्णपणे मोफत आहे. तरी विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बारावीची परीक्षा संपल्यानंतर बारावी नंतर काय..? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालक सातत्याने विचारत असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गाची निवड करणे हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या निवडीत मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी पालकांची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. हा 'बारावी नंतर पुढे काय..?' हा प्रश्न सोडविण्यासाठी आणि विद्यार्थी व पालक यांच्यासाठी पूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक विशेष करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे येथील असिस्टंट डायरेक्टर स्टुडंट अफेअर्स डॉ.उल्हास माळवदे, व सहाय्यक प्राध्यापक उदय मांडे तसेच ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षयकुमार भंडारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी अंबाजोगाई येथील तज्ज्ञ शिक्षकांना गुरूगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
*----बातमीतील चौकट-----*
या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यात एचएससीनंतर उपलब्ध विविध पर्याय, इंजिनियरिंग शाखेतील प्रवेश प्रक्रिया आणि संधी, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, एचएससी परीक्षेच्या तयारीसाठी योग्य रणनीती, तसेच देशातील प्रमुख महाविद्यालये आणि संस्था याबद्दल माहिती दिली जाणार आहे.

