संत तुकाराम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनला भेट

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
*_शैक्षणिक उपक्रम : विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतले पोलिस प्रशासनाचे कामकाज_*
==========================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील संत तुकाराम पब्लिक स्कूल, मोरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिस प्रशासनाचे कामकाज कसे चालते याची माहिती करून घेतली.
गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना जगण्याचा, समानतेचा अधिकार देण्यासोबतच आपले कर्तव्य सांगणारा जगातील सर्वांत मोठा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान होय. या निमित्ताने संत तुकाराम पब्लिक स्कूल, मोरेवाडी अंबाजोगाई या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधून नुकतीच ग्रामीण पोलीस स्टेशन, अंबाजोगाईचे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले पाटील व रंगनाथ सर यांना संविधानाचे पुस्तक भेट देऊन पोलिसांच्या कामकाजाची माहिती, शिस्त, विविध विभाग, तक्रार नोंदी, गुन्हे तपास याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती मिळवली. तसेच यावेळी साळुंखे सरांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तसेच दिपाली ठोंबरे मॅडम व सर्व स्टाफने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संचालक गोविंदराव ठोंबरे, मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद उपस्थित होते.

