अंबाजोगाई शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Zilla Vishesh

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

 

*समाजवादी पार्टीचे ऍड.शिवाजी कांबळे, राजेश परदेशी यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई शहरात मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन एका आठ वर्षीय मुलीला गंभीर जखमी केल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. त्यामुळे अंबाजोगाई शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी सोमवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहरात मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन एका आठ वर्षीय मुलीला गंभीर जखमी केल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. सदरील विषयासंदर्भात यापूर्वीच समाजवादी पार्टीच्या वतीने अंबाजोगाई नगरपरिषदेला निवेदन देवून पुर्वकल्पना दिली होती. तरी परंतु, वेळीच उपाययोजना करण्यात न आल्याने आज अंबाजोगाई शहरामध्ये शेकडोंच्या संख्येत मोकाट कुत्रे रस्त्याने फिरत आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना, ज्येष्ठ नागरिक व शाळेत, शिकवणीसाठी जाणाऱ्या लहान मुलांच्या जीवितास यामुळे धोका निर्माण झाला आहे. असे असताना ही नगरपरिषद अंबाजोगाई यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे सदर मोकाट कुत्र्यांची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु, समाजवादी पार्टीच्या वतीने यापुर्वीही निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत नगरपरिषद, अंबाजोगाई यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यामुळे क्रांतीनगर भागामध्ये एका आठ वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडू नये म्हणून तात्काळ आपण उपाययोजना कराव्यात अन्यथा नगरपरिषद प्रशासनाविरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव तथा चर्मकार सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड.शिवाजी कांबळे आणि अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदन देताना समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.