मराठा सेवा संघ केजचा उपक्रम—‘ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2025’ उत्साहात पार

Maharashtra

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

 

१६ केंद्रांतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उंची

 

केज (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघ, शाखा केज यांच्या वतीने आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2025 हा भव्य व प्रेरणादायी सोहळा रविवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालय, केज येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. तालुक्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत एकूण १६ केंद्रांतील १६ गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रानुसार गौरवित शिक्षक

 

लव्हूरी – महादेवी फुलसुरे (धर्माळा)

सारणी – मोहन ढाकणे (सारणी)

आडस – चव्हाण व्यंकट नारायण (हनुमाननगर)

चिंचोली माळी – संध्याराणी कोल्हे (लाखा)

साळेगाव – सुरेखा मोराळे (साळेगाव)

होळ – नवनाथ घुगे (होळ)

बनसोराळा – रेखा धेंडे (बोरी-सावरगाव)

केज – संगीता नवले (सोनिजवळा)

वाघेबाभूळगाव – नितीन हावळे (दरडवाडी)

विडा – स्वाती वरपे (देवगाव)

नांदूर – बाबुराव तांबडे (ढाकणवाडी)

पैठण – बालासाहेब लोखंडे (पांडूरंगवस्ती)

युसुफवडगाव – आश्रुबा गायकवाड (बावची)

काळेगाव – पुंडलिक पोपळघट (बोरगाव बु॥)

टाकळी – शामल जाधव (जाधवजवळा)

उर्दू केंद्र चिंचोली माळी – मोहसिन कुरेशी (लाखा)

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्र साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राकेश गिड्डे, सचिव जी.बी. गदळे, जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब चाळक, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, साहित्यिक हनुमंत घाडगे, प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक जनार्धन सोनवणे, जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे, तसेच भाई मोहन गुंड, रामकिसन मस्के, गोविंद शिनगारे, राहुल खोडसे, शशिकांत इंगळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

ज्येष्ठ नागरिक, माजी शिक्षक, शिक्षकवर्ग आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक उपाध्यक्ष युवराज हिरवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन विक्रम डोईफोडे यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव विष्णू यादव यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष जयदीप देशमुख, उपाध्यक्ष किशोर भालेराव, युवराज हिरवे, अश्विन टोम्पे, विष्णू यादव, महादेव ढाकणे, अतिश गाढवे, चंद्रकांत मोरे, तुषार पाटील, विक्रम डोईफोडे, राहुल देशमुख, जयराम देशमुख, क्रांतीदीप कांबळे, दीपक मोरे तसेच संपूर्ण मराठा सेवा संघ परिवाराने परिश्रम घेतले.

उपक्रमाचे समाजातून कौतुक

 

शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन असा उपक्रम राबविल्याबद्दल मराठा सेवा संघ केजचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षकांना प्रोत्साहन देणारा आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मकता वाढविणारा हा उपक्रम आगामी काळातही भव्य स्वरूपात व्हावा, अशी जनतेची अपेक्षा व्यक्त होत आहे.