.ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई च्या वतीने 1691 पुस्तकांची भेट

जालना ( प्रतिनिधी) ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई या सेवाभावी संस्थेच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर सेलूद तालुका भोकरदन जिल्हा जालना या शाळेला पंचवीस हजार रू किमतींची 1691 पुस्तके भेट देण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुस्तकांची उपलब्धता व्हावी. या उद्देशाने सदरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई ही संस्था ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची फीस भरण्यासाठी सहाय्य करते. त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना रेशनकिटचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत वेळेत पोहोचता यावी यासाठी सायकलींचे वाटप. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर. एन. वाघ सर यांचे कडे सदरील पुस्तके सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, सचिव प्राध्यापक भागवत गोरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

