.सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज शहराध्यक्षपदी इनामदार मोहसीनोद्दीन यांची निवड

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
केज प्रतिनिधी
केज - सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या केज शहर अध्यक्षपदी इनामदार मोहसीनोद्दीन यांची निवड दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून करण्यात आली यावेळी संघाचे अध्यक्ष गोविंद शिनगारे , प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख , केज तालुका अध्यक्ष अनिल ठोंबरे , तालुका सचिव डॉ लतिफ शेख , ता. उपाध्यक्ष सुमंत कदम , ता. कोषाध्यक्ष महादेव दौंड , तालुका संघटक काशीनाथ कातमांडे , तालुका कार्याध्यक्ष दत्तात्रय भाकरे , तालुका सहसंघटक काशीनाथ कातमांडे , तालुका सदस्य लासीणकर एम डी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना इनामदार मोहसीनोद्दीन यांनी संघाच्या वाढीसाठी सदैव तत्पर रहुन संघाच्या सामाजिक कार्यात योगदान देऊ व संघाचे नाव तालुका पातळीवर यशस्वी करु असे सांगितले व याप्रसंगी नवनिर्वाचित शहर अध्यक्ष यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

