महिलांचे उल्लेखनीय कार्य अभिमानास्पद - प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
महिलांचा सन्मान करून नवकेशरकडून प्रेरणा देण्याचे काम - कल्पना लोहिया
नवकेशर सेवाभावी संस्थेकडून नवरत्न पुरस्कारांचे वितरण
=====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील नवकेशर सेवाभावी संस्था, अंबाजोगाई संचलित नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्याकडून नवकेशर नवरत्न पुरस्कार वितरण सोहळा-२०२६ नुकताच आयोजित करण्यात आला होता.
शहरातील टी.बी.गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवार, दिनांक १५ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी तर विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून सौ.कल्पना अनिकेत लोहिया, परमेश्वर गित्ते (संपादक), आयोजक भीमाशंकर शिंदे, प्रा.सौ.आरती भीमाशंकर शिंदे (लिंबगावकर) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सौ.अर्चना चौरे, सौ.महादेवी कांबळे, सौ.अंजली लोहिया, लता रोडगे, कु.साक्षी लोमटे, सौ.अनुराधा निकम, डॉ.सुनीता तोंडगे, चित्ररेखा बांगर आणि सय्यद तरन्नुम अहमद अली यांना नवकेशर नवरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फेटा व शाल असे होते. यावेळी प्रास्ताविक करताना
संस्थेचे सचिव भिमाशंकर शिंदे यांनी सांगितले की, नवकेशर सेवाभावी संस्था, अंबाजोगाई संचलित नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्याकडून मागील १२ वर्षांपासून नवकेशर नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा - २०२६ आज रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत. आपण समाजाचे काही देणे लागतो. या भूमिकेतून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांना व समाजातील इतर महिलांना प्रेरित करणे हा या कार्यक्रमा मागचा आमचा विधायक हेतू व प्रयत्न आहे असे आयोजक शिंदे यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना पत्रकार परमेश्वर गित्ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील ९ महिलांना निवडून त्यांना नवकेशर नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणे खरोखरच कठीण काम आहे. परंतु, नवकेशर संस्था अतिशय प्रामाणिकपणे व योग्य महिलांना निवडून त्यांचा यथोचित सन्मान करते ही बाब अभिनंदनीय आहे. याप्रसंगी बोलताना
कल्पना लोहिया म्हणाल्या की, संसाराचा गाडा ओढत - ओढत आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला खरोखरच सन्मानास पात्र असतात. अशा महिलांचा सन्मान करून नवकेशर त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम करीत आहे. तसेच समाजातील इतर महिलांना या माध्यमातून प्रेरणा ही देत आहे असे श्रीमती लोहिया यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांनी सांगितले की, पुरूषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करतात ही बाब आम्हां सर्वांसाठीच अभिमानाची आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या पुरूषांपेक्षा सरस ठरतील यात शंका नाही. आज ज्या महिलांना नवकेशर नवरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या कार्यातून पुढे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करावा अशा प्रोत्साहनपर शुभेच्छा त्यांना देतो व नवकेशर संस्थेचे या कार्याबद्दल अभिनंदन करतो असे प्राचार्य डॉ.खडकभावी म्हणाले. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करून झाली. तर समारोप पुरस्कार प्राप्त महिलांच्या मनोगतपर भाषणांनी झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गणेश तौर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनिल व्यवहारे, बळीराम उपाडे, प्रवीण जोगदंड, संगीता व्यवहारे, सुशील कुंबेफळकर, सौ.कान्होपात्रा शिंदे, गणेश लांडगे, प्रशांत पौळ यांच्यासह नवकेशर सेवाभावी संस्था, अंबाजोगाई संचलित नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, जेष्ठ नागरिक, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

