बनसारोळ्यात ऊस व्यवसाय व उद्योजक परिषदेतून ऊसाला प्रती टन पाच हजारांची भाव देण्याची मागणी

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
*ऊस व्यवसाय शेतकरी हा उद्योजकच,ऊसात मोठ्या प्रमाणात लुटमार - अच्युत गंगणे
*ऊसातुन होणार शोषण थांबवा,शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु - उत्तम माने
*ऊसाचा काटा कोठही करून या असे आवाहन कारखानदारांनी करून विश्वासाहर्ता सिद्ध करावी - भाई मोहन गुंड
केज (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील बनसोळा येथे ऊस उत्पादक उद्योजक शेतकऱ्यांची दि१९ रोजी बळीराजच्या प्रतिमेचे पुजन करुन ऊस उद्योजक परिषद संपन्न झाली.
शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना 2800 रुपये भाव देता येतो मग आमच्या जवळच्या साखर कारखान्यात तर अनेक उपपदार्थ तयार केले जातात मग त्यांना कसा भाव शक्य होत नाही, कारखान्यासाठी हजारो योग्य जमिनी मध्ये ऊस शेतकरी लावतो आणि कारखान्याला ऊस पुरवतो म्हणून ऊस उत्पादक शेतकरी उद्योजक आहे, यावेळी सखोल असे मार्गदर्शन अचित बापू गगणे यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव देतात आमच्या कारखान्यांमध्ये राजकारण केलं जातं रिक्वरी चोरी काटा मारी यापुढे ही असली मक्तेदारी चालू देणार नसल्याचे मत उत्तमराव दादा माने यांनी व्यक्त केले,
सर्व साखर कारखान्याच्या काटा मारीच्या वलंगणा अनेक वर्षा पासून शेतकरी करत आहेत, ऊसाचा काटा कुठे ही करून शेतकऱ्यांनी कारखान्यात आणावा असे आवाहन करून स्वतःची विश्वासहारता सिद्ध करावी असेआवाहन भाई मोहन गुंड यांनी केल.
यावेळी प्रभाकर वाघमोडे, ॲड गोले इतर वक्त्यांनी यांनी शेतकऱ्याच्या शैलीमध्ये कारखानदार आणि या व्यवस्थेचा समाचार घेतला यावेळी पिळवणूक थांबबली पाहिजे असे मत व्यक्त केले, ऊस व्यावसाय व उद्योजक परिषद बनसारोळा
परिषदेत सर्वांनुमते संमत झालेले ठराव.
1) महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे नेते ऊस कारखान्यात गेल्यावर ऊसापासून काय काय पदार्थ व उपपदार्थ तयार होतात याचा हिशोब करायला साखर आयुक्तासोबत,लोकप्रतिनिधीसोबत व साखर कारखान्यांच्या विश्वस्त व व्यवस्थापकासोबत बैठका/मिटींगा घेतात परंतु ऊसाचा उत्पादन खर्च किती येतो त्याचा हिशोब करण्यासाठी साखर आयुक्त,लोकप्रतिनिधी व शेतकरी/ऊस व्यावसायिक बसत नाहीत तेंव्हा ती परंपरा सर्व संघटनांनीही सुरू करावी म्हणजे गेल्या अनेक दशकात ऊस व्यावसायिकांना किती तोटा झाला झाला त्याची जाणीव ऊसाचा भाव ठरविणारांना व भाव घेणारानांही होईल.
2) शेती अर्थव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव देणे व कमी भाव घेणे हा कायदेशीर जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ठरावा असा ठराव ही परिषद करते.
3) इथून पुढे ऊसाची लागवड करताना उसाच्या भावाचा करार शेतक-यांना ज्या कारखान्यांना ऊस द्यायचा आहे त्या कारखान्यांशी करार करण्याची परंपरा सुरू करण्यात यावी असा ठराव ही परिषद करते.
4) साखर कारखानदार व ऊस व्यावसायिक यांच्यातील संभाव्य कराराचा समन्वय साधण्याचे काम अॅग्रो प्रोडयूसर कंपन्यांनी हिररीने करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करावी असा ठराव ही परिषद करते.
5) एकूण ऊस व साखर कारखानदारीच्या व्यावसायात ज्याचे जेवढे योगदान त्याला तेवढा योगदानाधिष्टीत न्याय प्राप्त होईल असे सूञ निर्माण करण्यासाठी एकमेकांच्या योगदानाबद्दल सहयोग व नुकसानीबद्दल सहवेदना हे समन्वयाचे अंतरिक सूञ हे या उद्योगव्यावसायातील व्यावहाराने सिध्दांताला दुरूस्त करावे या मानवीय मूल्यांच्या जीवंतपणाशी बांधिलकी निर्माण व्हावी असे उद्योगातील योगसूञ ही परिषद निर्माण करू पाहत आहे.
6) तूर्तास सद्यपरिस्थितीत यावर्षी साखरेचे भाव वाढलेले आहेत व भविष्यातही साखरेच्या भावात व इथेनाॅलच्या भावातही प्रचंड वाढ अपेक्षित आहे,करिता पहिली उचल 3500 रू प्रतिटन कारखान्यांनी द्यावी असा ठराव ही परिषद करते.
7) वरील सर्व ऐतिहासिक ठरावांची अंमलबजावणी भविष्यात सुरळीत व सुलभ व्हावी यासाठी किमान उत्पादन खर्च 5000 रू प्रतिटन येत आहे,किमान उत्पादन खर्च भरून निघेल एवढातरी अंतीम भाव कारखान्यांनी द्यावा असा नैतिक ठराव ही परिषद करते आहे.
8) शेतक-यांनी ऊसाचे वजन प्रायवेट/खाजगी काट्यावर केल्यानंतरच साखर कारखान्यांनी ऊसाचे वजन करून ऊस गाळपास घ्यावा.
9)ऊसाची रिकव्हरी/साखर उतारा उसाच्या फडावरच जाहिर करावा.
10 आम्ही शेतकरी म्हणून नाही उद्योजक म्हणून जागणार असल्याचा क्रांतीकारक ठरवा घेण्यात आला.
वरील प्रमाणे ठराव घेण्यात आले यावेळी विचार पिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालासाहेब काकडे , ठराव समितीचे अध्यक्ष नारायण पांडे, यावेळी आरूण कुलकर्णी , गणपत गोरे माधवराव दहिफळे , अॅड.नारायण गोले अॅड. दिलीप करपे, राजाभाऊ पवार, राजेभाऊ नाना यादव संजय आपेट ईस्माईल शेख शामराव गुळविले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हनुमंत घाडगे सर यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजूभाऊ धायगुडे महेश गायकवाड अजित पवार तुषार गलांडे अक्षय तोंडे यांनी परिश्रम घेतले. जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

