केजच्या चि.चैतन्य देशपांडे ची आयर्लंड ला भरारी

आवाज महाराष्ट्राचा न्यूज विशेष/ देश विदेश
केज/प्रतिनिधी---
श्री स्वामी समर्थ मठ केज येथील श्री दिनेश देशपांडे यांचे चिरंजीव चैतन्य देशपांडे यांनी आयर्लंड या देशातील जागतीक पातळीवर नावाजलेल्या yahoo.com या कंपनी मध्ये Software developer म्हणून नौकरी मिळवली आहे. याबद्दल केज नगरपंचायतचे सर्वेसर्वा मा.हारुणभाई इनामदार व सर्व केजकर देशपांडे यांनी श्री समर्थ मठ केज येथे सत्कार करून अभिनंदन केले आहे.पुढे बोलताना मा.हारुणभाई इनामदार यांनी चैतन्य यांनी केज शहराचे व तालुक्याचे सात समुद्रापलीकडे नावलौकीक केले असे अभिनंदनपर मत व्यक्त केले.
चि.चैतन्य देशपांडे यांनी Engineering JNEC छत्रपती संभाजीनगर येथे पुर्ण करुन, 3 वर्ष Reliance jio मध्ये Software developer म्हणून काम केले होते.त्यानंतर डबलिंग आयर्लंड येथे Masters in Computer Science केले आणि आयर्लंड येथीलच जागतिक पातळीवरील yahoo.com या कंपनीमध्ये Software developer म्हणून नौकरी मिळवली आहे. या यशाबद्दल केजशहरवासीय,मित्रपरिवार व व्यापारी वर्गाकडून चि.चैतन्य यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. चि.चैतन्य हे केज येथील श्री.गणेश देशपांडे व श्री.मंदार देशपांडे यांचे पुतणे आहेत.यावेळी श्रीस्वामी समर्थ मठ येथील सत्कार कार्यक्रमास मा.हारुणभाई इनामदार,श्री.प्रविण देशपांडे,श्री.बाळासाहेब ठोंबरे,यादव सर, वाद्यमारे सर, व केजकर देशपांडे परिवारातील जेष्ठ व कनिष्ठ मान्यवर महिला पुरूष उपस्थित होते.

